देश - विदेशमनोरंजन
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर झाला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतरत्न लता मंगेशकरांच्या निधनानंतर पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान मोदींना जाहीर झाला आहे. तसंच दरवर्षी देशहित आणि समाजहितासाठी काम करणाऱ्या एका व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार पंतप्रधान मोदींना जाहीर झाला आहे.
पंतप्रधान मोदींना लता मंगेशकरांच्या निधनानंतर पहिलाच पुरस्कार जाहीर झाला असून पुढच्या वर्षी अमिताभ बच्चन आणि दोन वर्षांनी सचिन तेंडुलकर यांना हा पुरस्कार दिला जाणार असल्याचं समजतंय.