युवराज मोहंमद सलमान जबाबदार?

पत्रकार जमाल खाशोगी हत्येप्रकरणी
जेद्दा : सौदी अबियाच्या दौर्यात अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन व सौदीचे युवराज मोहंमद बिन सलमान यांच्या भेटीच्या वेळी पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केल्याचा दावा बायडेन यांनी केला. ते म्हणाले, मोहंमद बिन सलमान यांच्या सौदी सरकारचे प्रखर टीकाकार म्हणून ओळखले जाणा खाशोगी यांची २ ऑक्टोबर २०१८ रोजी इस्तंबूल येथील सौदी अबियाच्या दूतावासात हत्या झाली होती. ‘‘मानवी हक्कांच्या मुद्द्यावर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी मौन बाळगणे हे आम्ही कोण आहोत किंवा मी कोण आहे, याच्याशी विसंगत असल्याने मी अगदी थेटपणे विचारले. मी नेहमीच नीतीमत्तेची बाजू घेतली आहे.
जमाल खाशोगी यांच्या हत्येला तुम्ही जबाबदार आहात, असे मी सलमान यांना थेटपणे म्हणालो. यावर चर्चा व्हायला हवी, असे मला वाटते.’’ सौदी अबियात २०१८ मध्ये खाशोगी यांची हत्या झाली. या हत्येला युवराज जबाबदार आहेत, असे अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचा दावा आहे. ‘‘खाशोगी यांच्या मृत्यूला मी स्वतः जबाबदार नसल्याचा दावा सलमान यांनी केला आहे. या हत्येच्या मागे असणार्या लोकांवर आम्ही कारवाई केली आहे,’’ असे उत्तर युवराज सलमान यांनी दिले आहे. खाशोगी यांच्या हत्येनंतर अमेरिका व सौदी अबियाच्या संबंधात कटूता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बायडेन यांच्या सौदी अबियाच्या दौर्याला महत्त्व आले आहे. पश्चिम आशियातील सुरक्षा भागीदारीला पुन्हा चालना देण्यासाठी व जगभरातील तेलाच्या पुरवठ्यासाठी संबंध प्रस्थापित करण्यासाठी या दोन नेत्यांमधील ही पहिली भेट जेद्दामधील शाही राजवाड्याच्या परिसरात झाली.
या राजवाड्यात बायडेन तीन तास होते. सौदी अबियातील सुधारणा योजनांसाठी गुंतवणूक आणणे, अमेरिकेशी सुरक्षा संबंध मजबूत करण्याबरोबरच स्वतःची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करणार्या युवराज सलमान यांचा हा राजनैतिक विजय असल्याचे समजले जात आहे. बायडेन व युवराज सलमान हे एकत्रितपणे पावले उचलत असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. अमेरिकेचे शांती सैनिक वर्षाच्या अखेरीस लाल समुद्रातील तिरान बेट सोडून जातील, असे बायडेन यांनी जाहीर केले आहे. केवळ तेलावर अवलंबून न राहता सौदी अर्थव्यवस्थेच्या विस्तारीकरणाचा एक भाग म्हणून या बेटाचा विकास पर्यटनाच्या दृष्टिकोनातून करण्याची योजना आहे. धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या बेटाचा ताबा सोडण्यासाठी अमेरिकेला इस्राईलची परवानगी घेणे आवश्यक होते. त्यानुसार ती मिळाल्याने इस्राईल आणि सौदीच्या स्नेहपूर्ण संबंधांची सुरुवात असल्याचे मानले जात आहे. खाशोगी यांचा जन्म मेडिना येथे १९५८ मध्ये झाला. अमेरिकेतल्या इंडियाना युनिव्हर्सिटीतून ते एमबीए झाले. त्यानंतर ते सौदी अबियात परतले आणि १९८० च्या सुमारास त्यांनी पत्रकारिता करायला सुरुवात केली. सौदी अबियात चालणार्या संघर्षाचे त्यांनी स्थानिक वर्तमानपत्रातून वार्तांकन केले.
ओसामा बिन लादेन यांच्याबद्दलच्या बातम्या करण्यासाठी ते प्रसिद्ध होते. त्यांनी १९८० ते १९९० या काळात त्यांनी अनेकदा ओसामा बिन लादेनची मुलाखत घेतली होती. मध्य आशियातल्या महत्त्वांच्या घडामोडीचे त्यांनी वार्तांकन केले होते. कुवैतमध्ये सुरू झालेल्या संघर्षाचे रिपोर्टिंग त्यांनी केले आणि १९९० मध्ये ते एका इंग्रजी वृत्तपत्राचे डेप्युटी एडिटर बनले. २००३ मध्ये ते अल वतन या वर्तमानपत्राचे संपादक झाले. मात्र दोनच महिन्यांत सौदीच्या प्रशासनाविरोधात टीका केल्यामुळे त्यांना काढून टाकण्यात आले होते.