ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

‘गुरुजी’, ‘बाबा’ पुरावा आहे का? फडणवीस-चव्हाणांमध्ये रंगला कलगीतुरा

मुंबई | Maharashtra Politics – महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्यासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्याविरोधात शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या विरोधात सध्या राज्यभरात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. बुधवारी संभाजी भिडेंच्या अटकेसाठी विधानसभेत विरोधक आक्रमक झाले होते. संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरून विधानसभेत गदारोळ झाला.

संभाजी भिडे मुक्तपणे वावरत आहेत. सरकार कुठलीही कारवाई करीत नाही, त्यामागे पोलिसांचे संरक्षण त्यांना मिळाले आहे. या माणसाला एवढे संरक्षण कसे मिळते. निवडणुकीला फायदा करून घेण्यासाठी हे उद्योग सुरू नाहीत ना? ज्या व्यक्तीला तुम्ही गुरुजी म्हणतात त्याचा पुरावा काय, ते पीएचडी झाले, त्याचा काही पुरावा आहे का? असे सवाल पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी उपस्थित केले. यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं.

संभाजी भिडेंविरोधात विधानसभेत विरोधकांची जोरदार घोषणाबाजी केली. गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी संभाजी भिडे यांचा उल्लेख गुरुजी केल्याने विरोधकांनी गोंधळ सुरू केला. त्यावर संभाजी भिडे आम्हाला गुरुजी वाटतात, तुम्हाला (विरोधकांना) काय हरकत आहे? असा सवाल फडणवीस यांनी केला. तसेच संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्वासाठी काम करतात, गडकिल्ल्यांसाठी काम करतात, मात्र महापुरुषांवर बोलण्याचा अधिकार नाही, असे फडणवीस म्हणाले.

पुढे देवेंद्र फडणवीस पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाण साधत म्हणाले की, त्यांचे नावच भिडे गुरुजी आहे. आता यांचे नाव पृथ्वीराज बाबा आहे. बाबा कसे आले याचा पुरावा मागू का? असा पुरावा मागता येतो का, त्यांचे नावच भिडे गुरुजी आहे. तसेच भिडे यांना कोणतीही सुरक्षा पुरवली नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये