प्रियांका चोप्राची लेक बनली ग्लोबल स्टार; ‘त्या’ व्हिडीओनं वेधलं सर्वांचं लक्ष
Priyanka Chopra’s Daughter Malti | बॉलिवूडची देसी गर्स प्रियांचा चोप्रा (Priyanka Chopra) ही नेहमी चर्चेत असते. तिनं तिच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवलं आहे. त्यामुळे प्रियांकाचा चाहतावर्गही लाखोंच्या संख्येत आहे. तर आता प्रियांकासोबत तिची लेक मालती (Malti) देखील चर्चेत आली आहे. सध्या प्रियांकाचा पती निक जोनसच्या कार्यक्रमामधील मालतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
प्रियांका चोप्रा तिची लेक मालतीसोबत निक जोनसच्या कॉन्सर्टमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळीचे प्रियांका आणि मालतीचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर या कॉन्सर्टमध्ये मालतीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. सध्या तिच्या एका व्हिडीओनं सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये प्रियांका गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तर तिनं मालतीला कडेवर घेतलेलं दिसत आहे. त्यावेळी प्रियांका आणि मालती बाहेर येत असताना मालती गर्दीच्या दिशेने हात फिरवते आणि सर्वांचा निरोप घेते. तर मालतीनं केलेलं बायबाय पाहून प्रियांकालाही हसू आवरत नाही.
सध्या माय-लेकीचा हा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. तसंच या व्हिडीओनंतर नेटकऱ्यांकडून मालतीवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
https://www.instagram.com/reel/CyeRuF8ytHF/?utm_source=ig_web_copy_link