ताज्या बातम्यामनोरंजन

“…त्यामुळे जगात सर्व काही ठिक नाही”, भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रियांका चोप्राचं वक्तव्य चर्चेत

मुंबई | Priyanka Chopra’s Statement In Discussion – अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं फक्त बाॅलिवूडमध्येच (Bollywood) नाही तर हाॅलिवूडमध्ये (Hollywood) देखील आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. तसंच प्रियांका नेहमी सामाजिक स्तरांवरील विविध विषयांबद्दल भाष्य करत असते. काही दिवसांपूर्वी प्रियांकाने संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केलं आहे. यावेळी तिनं तिच्या भाषणादरम्यान जगभरातील विविध विषयांवर भाष्य केलं. याचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील प्रियांकाने शेअर केले आहेत. ‘हल्ली जगात सर्व काही ठिक चालेलं नाही’, असं प्रियांका चोप्रानं म्हटलं आहे. यामुळे सध्या ती चांगलीच चर्चेत आली आहे.

प्रियांका चोप्रानं न्यूयाॅर्कमधील संयुक्त राष्ट्र महासभेतील काही फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोत प्रियांकानं वेनेसा नकातेसोबत पोज दिली. तर इतर फोटोत तिच्यासोबत मलाला युसुफ, अमांडा गोरमन, सोमाया फारुकी आणि ज्युडिथ हिल यांच्यासोबत पोज देताना दिसत आहे. तसंच सध्या तिच्या भाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

यावेळी प्रियांका म्हणाली, “आज आपण सर्वजण एका अशा महत्त्वपूर्ण टप्प्यावर भेटलो आहोत, तिथे जागतिक एकता ही नेहमीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे. सध्या जग हे हवामानातील बदल आणि कोव्हिड 19 या साथीच्या रोगाचा सामना करत आहे. आधीच जगाला संघर्ष, द्वेष, गरिबी, उपासमार आणि असमानता यासारख्या चिंता सतावत आहेत, त्यामुळे जगात सर्व काही ठीक नाही. पण ही संकटे अचानक आलेली नाहीत आणि योग्य योजना आखून त्या संकटांवर मात करता येईल. ती योजना युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स यांच्याकडे आहे.”

“मी भारतात लहानाची मोठी झाली आहे. भारतात जगातील इतर अनेक भागांप्रमाणेच अनेक मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवणे हे आव्हान वाटते. एकीकडे मुलांना शिकायचे असते कारण त्यांच्या ती प्रबळ इच्छा असते. तर दुसरीकडे त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. पण माझा विश्वास आहे की शिक्षण म्हणजे समता, सामाजिक न्याय, सामाजिक परिवर्तन आणि लोकशाहीचा आधार आहे. त्यामुळे ही समस्या लवकर दूर होईल”, असंही प्रियांकानं म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये