Bigg Boss 17: ‘बिग बॉस 17’च्या घरात एन्ट्री केलेल्या मनारा चोप्राचं प्रियांका-परिणीतीशी आहे खास नातं; जाणून घ्या…

Bigg Boss 17 | सर्वात लोकप्रिय असा शो ‘बिग बॉस 17’ला (Bigg Boss 17) सुरूवात झाली आहे. सलमानच्या खानच्या (Salman Khan) या खास शोमध्ये अनेक प्रसिद्ध कलाकांनी एन्ट्री केली आहे. यामध्ये बिग बॉसच्या घरात पहिली एन्ट्री केली ती अभिनेत्री मनारा चोप्राने (Mannara Chopra). मनारा चोप्रा ही प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिनं हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
सध्या चर्चेत असलेली मनारा चोप्राचं प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि परिणीती चोप्राशी (Parineeti Chopra) खास नातं आहे. मनारा ही प्रियांका आणि परिणीतीची चुलत बहिण आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात मनारानं प्रवेश करताच ती चांगलीच चर्चेत आली आहे. तिचा चाहतावर्ग देखील लाखोंच्या संख्येत आहे.
मनारा ही अभिनेत्री, मॉडेल असण्यासोबत ती एक फॅशन डिझायनर देखील आहे. तसंच तिनं 40 पेक्षा अधिक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. तिनं 2014 मध्ये ‘जिद’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिनं थिक्का, जक्कन्ना अशा अनेक तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं. तर कावल, प्रेमा गीमा जांथा नाई, सीता या चित्रपटांमध्ये देखील तिनं काम केलं आहे.
https://www.instagram.com/reel/CybLDx8Npe6/?utm_source=ig_web_copy_link
आता मनारानं बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे. तिनं बिग बॉसच्या घरात प्रवेश करताच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तसंच मनारानं सलमान खानसोबत ‘लाल दुप्पटा’ गाण्यावर जबरदस्त असा डान्स देखील केला.