बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार आणि राज्यात झालेले मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी महाविकास आघाडीने निषेध आंदोलन सुरु केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसरात तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वत: शरद पवार उपस्थित होते. पाऊस सुरु असताना मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी भर पावसात सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले.
सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, मोठ्या आंदोलनाची ही फक्त सुरुवात आहे, आपणास मुलींच्या सुरक्षितेसाठी मोठे काम करायचे आहे. गाव, वाडी, वस्तीवर जाऊन काम करायचे आहे. दौंडमध्ये काल मी गेले. त्या ठिकाणी घडलेली घटना पाच ते सहा वर्षांपूर्वीची आहे. आता लोक पुढे येत आहे. त्यामुळे त्या पालकांना धीर देण्याची गरज आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, सत्तेतल्या लोकांनी असे भाष्य केले की , बदलापूरला आंदोलन झाले त्यात आलेले लोक बाहेरचे होते. ते कुठलेही असोत, ते भारतीय होते आणि भारताच्या लेकीसाठी लढत होते. याची नोंद या सरकारनं घेतली पाहिजे. शेवटी सत्य बाहेर आलंच. तिथलं कुणीही बाहेरचं नव्हतं. ती बदलापूरची सामान्य जनता होती जी त्यांच्या लेकीसाठी लढत होती. यातून सरकारची विचारसरणी काय आहे हे उघड झालं आहे”, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले पुण्यात बलात्कार झालेल्या प्रकरणात दोन महिन्यांत आपण त्या नराधमाला फाशी दिली. असं झालं असेल तर आपण सगळे जाहीरपणे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करायला जाऊ. प्रत्येक गोष्टीसुप्रिया सुळे त गलिच्छ राजकारण आणायचं. इतकं असंवेदनशील सरकार मी आजपर्यंत पाहिलं नाही”, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांना ( Supriya Sule) लक्ष्य केलं.