ताज्या बातम्यापुणे
आरोग्य विभागाच्या विरोधात आयुक्त कार्यालयात आंदोलन
शहरात डेंगी, चिकनगुनियाच्या साथीने थैमान घातले आहे, घराघरांत सर्दी, तापीने फणफणलेले रुग्ण आहेत. तरीही महापालिकेचा आरोग्य विभाग खोटी आकडेवारी देत आहे. औषध फवारणी करत नाही असा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात जोरदार आंदोलन केले. यावेळी हातामध्ये फलक घेऊन घोषणाबाजी केली.