ताज्या बातम्यापुणेसिटी अपडेट्स

Pune News: मराठा आरक्षणाचं लोन पुण्याच्या वेशीवर, नवले ब्रीज परिसरात रास्ता रोको आंदोलन

पुणे | Pune News : सध्या मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील विविध भागांमध्ये आंदोलन केलं जात आहे. तसंच मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आहेत. या आंदोलनाचं लोन आता पुण्यात (Pune) पोहलचं आहे. पुण्यातील नवले ब्रीजवर (Navale Bridge) चांगलंच वातावरण तापलं आहे.

पुण्यात मराठा आरक्षणावरून अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. यामध्ये नवले ब्रीजवर मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आहेत. आंदोलकांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात टायर जाळले असून काही वाहनांना आग लावली आहे. त्यामुळे नवले ब्रीजवरील दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये