संतापजनक! PSIने केला 4 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार; वडील तक्रार दाखल करायला गेले असता त्यांनाच टाकले तुरूंगात
Crime News | प्रत्येक पोलिसाचं काम हे नागरिकांची सुरक्षा करणं असतं. पण आता पोलिसच नागरिकांसोबत क्रूरकृत्य करत असल्याच्या घटना घडताना दिसत आहेत. राजस्थानमध्ये (Rajasthan) एक संतापजनक घटना घडली आहे. राजस्थानमधील एका पोलीस उपनिरीक्षकानं (PSI) चार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
राजस्थानमधील राहुवास गावात दौसात भूपेंद्र सिंह नावाच्या पोलीस उपनिरीक्षकानं अवघ्या चार वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर तेथील परिसरात नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
उपनिरीक्षक भूपेंद्र सिंह हा दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची भाड्याची खोली घेऊन राहत होता. तिथे एक चार वर्षांची निष्पाप चिमुकली त्याच्या खोलीजवळ खेळत होती. तेव्हा त्याची नजर त्या चिमुकलीवर पडली. त्यानंतर त्यानं त्या लहान मुलीला आपल्या खोलीत नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर तेथील लोकांनी आरोपी पोलिसाला मारहाण केली आणि त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
या घटनेनंतर पीडित मुलीचे वडील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेले होते. त्यावेळी पोलिसांनी तक्रार दाखल करवून न घेता उलट पीडितेच्या वडिलांनाच तुरूंगात टाकले. तसंच पोलिसांनी वडिलांना मारहाण करत त्यांचा हात तोडला. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस उपनिरीक्षकानं पीडितेच्या वडीलांना आंघोळ घालण्यास सांगितले जेणेकरून त्यांना मारहाण केल्याचा पुरावा पुसला जाईल.