ताज्या बातम्यापुणे

लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधात पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा

पुणे | लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या विरोधी कायदा जिल्ह्यासह राज्य आणि देशात लागू करण्यात यावा, आदी प्रमुख मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने पुण्यात हिंदू जनआक्रोश भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा लाल महाल ते डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत असणार आहे. या मोर्च्यात ‘होय मी धर्मवीरच !’, ‘गो हत्या मुक्त पुणे’, ‘फाल्गुन अमावस्या अर्थात धर्मवीर दिन’, ‘लव जिहाद मुक्त पुणे’ असे फलक घेऊन विविध हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत.

यावेळी आमदार शिवेंद्र राजे भोसले, आमदार भीमराव तापकीर,तेलंगणाचे आमदार राजा भैया ठाकूर, तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, मिलिंद एकबोटे, निवृत्त पोलीस अधिकारी भानू प्रताप बर्गे हे सहभागी झाले आहेत. लाल महाल येथून 11 वाजण्याच्या सुमारास मोर्चाला सुरवात झाल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून लक्ष्मी रोडने हा मोर्चा डेक्कन परिसरातील धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पोहोचणार आहे. शहरातील विविध राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळे देखील या मोर्चात सहभागी झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये