ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रसिटी अपडेट्स
‘तुम्ही-आम्ही पालक’ मासिकाच्या 100 व्या अंकाचे प्रकाशन

पुणे | Pune News – ‘तुम्ही-आम्ही पालक’ मासिकाच्या शंभराव्या अंकाचे प्रकाशन व लेखकांच्या सन्मान सोहळ्याचे शनिवारी (5 ऑगस्ट ) स. 11.30 वाजता घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्रात आयोजन केले आहे.
राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या हस्ते हा सोहळा होणार असून, यावेळी बीव्हीजी उद्योग समूहाचे संस्थापक हनुमंतराव गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे असणार आहेत, अशी माहिती ‘तुम्ही-आम्ही पालक’चे संस्थापक संपादक हरीश बुटले यांनी दिली.