सणासुदीमध्ये डाळींना महागाईचा तडका!
पुणे | राज्याच्या बर्याच भागात पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. खरिपातील पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाने ओढ दिल्याने सणासुदीच्या तोंडावर डाळींच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे.
आवक कमी असल्यामुळे डाळींच्या भावात गत आठवड्यात क्विंटलमागे ५०० ते १००० रुपयांनी वाढ झाली. यामध्ये तूरडाळ व मसूरडाळीत सर्वाधिक क्विंटलमागे १ हजार रुपयांची वाढ झाल्याचे सांगण्यात आले. तर, अन्य डाळींच्या दरात क्विंटलमागे ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. हिरवा आणि पांढरा वाटाणा, हरभरा, तसेच हुलग्याचे दरही कडाडले आहेत.
मात्र, मागणीअभावी खाद्यतेलांचे दर स्थिर आहेत, तर साखरेला मागणी वाढल्याने क्विंटलमागे ५० रुपयांनी वाढ झाली. जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ रोखण्याकरिता केंद्र सरकारने ५० लाख टन गहू आणि २५ लाख टन तांदळाची खुल्या बाजारात विक्री करण्याचे घोषित केले आहे. या घोषणेचा तूर्ततरी गहू अणि तांदळाच्या दरावर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र, आगामी काळात प्रत्यक्ष माल बाजारात आल्यानंतर याचा परिणाम दिसून येईल,