क्राईमताज्या बातम्यापुणे

पुण्यात वाईन शॉपवर सशस्त्र दरोडा; आरोपींमध्ये चार अल्पवयीन मुलांचा समावेश

पुणे | विद्येचे माहेरघर असलेले पुणे आता गुन्हेगारीचे माहेरघर (Pune Crime News) होत चालले आहे. पुण्यातील उत्तमनगरमधल्या वाईन शाॅपवर दरोडा टाकण्यात आला आहे. 3 लाखांच्या रोकडसह दारूच्या बाटल्या लंपास करण्यात आल्या आहेत. या दरोड्यात दरोडेखोरांनी 3 लाखांची रोकड, आणि दारुच्या बाटल्या चोरुन नेल्यात. हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. विशेष म्हणजे या दरोडेखोरांनी ग्राहकांची वरदळ असताना या दरोडेखोरांनी हे धाडस केलंय. या दपरोडेखोरांनी हातात कोयता आणि तलवारीचा धाक दाखवत हे वाईन शॉप लुटलंय.

याप्रकरणी आता उत्तमनगर पोलिस ठाण्यात सहा जणांच्या विरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज बाळासाहेब (वय 33) यांनी या घडलेल्या प्रकरण बाबत फिर्याद दिली आहे.

नेमकं काय घडलं

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडे 9 वाजताच्या सुमारास पाच ते सहा जणांनी तलवार आणि पिस्तूलाचा धाका दाखवत वाईन शॉप मध्ये घुसले. वाईन शॉप मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धाक दाखवून गल्ल्यातील अंदाजे तीन लाख रुपयांची रोकड, आणि ब्लेंडर्स प्राईडच्या तीन हजार दोनशे रुपयेच्यांच्या दोन बाटल्या बॅगेत भरून तिथून निघून गेले. सोबत आलेल्या इसमाने हवेत तलवार फिरवत “कोण मध्ये आलं तर त्याला मारून टाकू” अशी धमकी दिली. सगळे दरोडेखोर तिथून पसार झाले. मात्र या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ माजली असून भीतीचं वातावरण पसरलं आहे. याप्रकरणी आता उत्तमनगर पोलिस ठाण्यात सहा जणांच्या विरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये