ताज्या बातम्यापुणे

दौंडमध्ये भीमा नदी पात्रात शाळकरी पोरं पोहायला उतरली अन् पुढे अनर्थ घडला…

पुणे | दौंड शहरातील तीन अल्पवयीन मुले भीमा नदीपात्रात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दौंड तालुक्यातील हातवळण गावात हा प्रकार घडला आहे. विशाल दिलेराम सिंग (वय 16), निखिल नरेषसिंग कुमार (वय 15) आणि अमित रामेश्वर राम (वय 16) अशी या मुलांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील हातवळण येथील वसंत विठठल फडके यांच्या गुऱ्हाळावर काम करणाऱ्या मजूर दिलेराम भस्सु सिंग (वय 45) यांचा मुलगा विशाल, भाचा निखिल आणि मेव्हणीचा मुलगा अमित, देव, निपिलकुमार आणि निरजकुमार असे सहा जण शनिवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास हातवळण येथील भीमा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, यामधील तीघे जण नदीच्या पात्रात वाहून गेले.

घटनेची माहिती मिळताच भिमा नदीच्या पात्रात यवत आणि पाटस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मासेमारी करणारे मच्छीमार यांच्या होडीतून आणि ग्रामस्थांच्या मदतीने या मुलांच्या मृतदेह शोध कार्य सुरू केले. मात्र, बराच वेळ शोध कार्य केल्यानंतर अमित याचा मृतदेह आढळून आला. त्याचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी अमित याला उपचारापूर्वी मृत झाल्याचे सांगितले. तर विशाल आणि निखिल हे अद्यापही सापडले नाहीत. पोलीस भिमा नदीच्या पात्रात शोध घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये