ताज्या बातम्यापुणे

पुण्यातील करबुडव्यांचा शोध सुरू! कर संकलन विभागातून वसुलीसाठी तीव्र मोहीम

पुणे | महापालिकेच्या (PMC) खर्चाचा डोलारा सांभाळण्यासाठी मिळकतकर विभागावर (Property Tax) प्रमुख जबाबदारी आहे. त्यामुळे या विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी विशेष भर दिला जात आहे. गेल्या महिनाभरात सुमारे 300 मिळकती सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सील केलेल्या मिळकतींची संख्या 2 हजार 34 झाली आहे. या सील केलेल्या मिळकती प्रामुख्याने व्यावसायिक मिळकती आहेत. तर या मिळकतींची थकबाकी तब्बल 127 कोटी रुपयांची आहे.

दरम्यान, कर संकलन विभागाचे उत्पन्न 1,585 कोटी रुपयांवर पोहचले असून डिसेंबर अखेरीस 1,800 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट असल्याची माहिती करसंकलन उपायुक्त डॉ. अजित देशमुख यांनी दिली. या विभागास या वर्षी आयुक्तांनी सुमारे 2,400 कोटींच्या महसूलाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, महापालिकेच्या 40 टक्के सवलतीचा गोंधळ झाल्याने या वर्षी जवळपास दोन महिने उशिराने पुणेकरांना मिळकतकराची बिले देण्यात आली आहेत.

त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून ही सवलत कायम ठेवण्यात आली असली तरी नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती असल्याने अद्यापही अनेकांनी कर भरलेला नसल्याने पालिकेचे उत्पन्न घटले आहे. त्यावर महापालिकेने आक्रमक भूमिका घेत मिळकती सील करण्याचा सपाटा लावला असून या आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत दोन हजार मिळकती सील केल्या आहेत. तर त्यातील 202 मिळकतींचा लिलाव पुढील महिन्यात केला जाणार आहे

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये