
पुणे : (Pune CBI Raid News) मागील काही दिवसांपासून सीबीआयचे राज्यात छापेमारीचे धाडसत्र सुरु आहे. यामध्ये राजकीय नेत्यांपासून ते अतिउच्चपदस्थ आधिकाऱ्यांना लक्ष केलं जात आहे. अशातच आज पुण्यातील महसूल विभागाच्या एका अतिउच्चपदस्थ अधिकाऱ्यावर सीबीआयनं छापेमारी केली आहे.
दरम्यान, सीबीआयचे डीआयजी सुधीर हिरेमठ साहेबांच्या नेतृत्वाखाली सीबीआयच्या टीमनं ही मोठी कारवाई केली आहे. छापेमारी अद्याप चालू असून पुढील तपास करण्यात येत आहे.