ताज्या बातम्यापुणे
महाराष्ट्रभर मन्याचीच चर्चा; पोस्टरमार्फत दिल्या भावपूर्ण श्रद्धांजली
महाळुंगे | अफाट पराक्रमाने मनुष्यच फक्त जगजेता होत नाही,तर काही पशु देखील आपल्या पराक्रमाने मनुष्याचे मन जिंकतात आणि त्यापुढे मनुष्याचा पराक्रम देखील कमी पडतो.पुणे जिल्ह्याच्या बैलगाडा क्षेत्रातील बेताज बादशहा अपराजित योद्धा आणि सप्तहिंदकेसरी ही पदवी मिळवून बैलगाडा शर्यत क्षेत्रात आपलं नाव स्वतःच्या वेगाच्या जोरावर महाराष्ट्रभर करणारा व गाडा शौकीनांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा ‘मन्याभाई’ बैलाचे निधन झाल्याने बैलगाडा क्षेत्रावर शोककळा पसरली. मन्याला भावपूर्ण श्रद्धांजलीचे फ्लेक्स जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात लागले आहेत. मन्याभाई गेल्यानंतर आता त्याच्या पराक्रमाची चर्चा पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रभर होतेय.