पुण्यातील महिला पोलीसाच्या ‘या’ कामगिरीमुळे, तुम्हीही सलाम कराल!

पुणे : (Pune City News) शहराला सर्वच गोष्टींचा वसा आणि वारसा लाभला आहे, त्याची प्रचिती वेळोवेळी देसून येते. शुक्रवारी पुण्यात दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याला नदि-नाल्याचे स्वरूप प्राप्त झालं होतं. मात्र, रस्त्यावरील साचलेल्या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी महिला पोलिस नाईक साबळे यांची प्रयत्नाची शर्थ केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताच त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव सुरू झाला.
दरम्यान, नाईक साबळे यांनी आपल्या वाहतूक नियमाचे काम चोख बजावत असतानाच, सामाजिक भानही जपल्याचे पहायला मिळाले. सहकार नगर परिसरात झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे अनेक ड्रेनेजवर कजरा अडकल्यामुळे ते ब्लाॅक झाले होते. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. त्या साचलेल्या पाण्याला वाट करुन देण्यासाठी अडकलेला कचरा त्यांनी स्वतः पाण्यात उतरून, हाती लागेल त्या वस्तूने पाणी जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली.
त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे. ऊनपावसात दिवसरात्र राबणाऱ्या पोलिसांकडे तसं अनेकांचं दुर्लक्ष होतं. मात्र इतरांच्या भल्यासाठी झटणाऱ्या या महिला पोलिसाला सलाम ठोकल्यावाचून तुम्ही राहणार नाही.