जप्त केलेला माल सोडून देण्याचा खोटा करार, व्यापाऱ्याचे कोट्यावधी घेऊन गुन्हेगार फरार..

पुणे : (Pune Crime News) कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात रोज शेकडो गुन्हे घडत आहेत. त्यातच आता केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (Central Customs Department) जप्त केलेला माल स्वस्तात मिळवून देण्याचा खोटा करार करुन पुण्यातील व्यापाऱ्याचे (Merchant) तब्बल 66 कोटी 33 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) करुन गुन्हेगार फरार झाला आहे. याप्रकरणी नवी मुंबईतील चार जणांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
दरम्यान, याबाबत सोहम इम्पेस प्रा. लि. चे (Soham Impace Pvt. Ltd.) दशरथ मच्छिंद्र कोकरे (Dashrath Machindra Kokre), वर्षा दशरथ कोकरे (Varsha Dashrath Kokre), महेश रामभाऊ बंडगर (Mahesh Rambhau Bandgar), सागर रामभाऊ बंडगर Sagar Rambhau Bandgar (सर्व रा. खारघर, नवी मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मार्केट यार्ड (Market Yard) येथील एका व्यापाऱ्याने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारात (Wholesale Market) सुपारी, काळी मिरीची निर्यात करण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या ओळखीतील एकाने आरोपी कोकरे यांच्याशी ओळख करुन दिली. कोकरे कस्टम ने जप्त केलेला माल स्वस्तात मिळवून देतात. यामध्ये गुंतवणूक (Investment) केल्यास मोठा फायदा होईल असे आमिष आरोपींनी फिर्यादी यांना दाखवले.