क्राईमताज्या बातम्यापुणे

पुण्यात गणोशत्सावाला गालबोट! शेंडी टोळी अन् सूर्या टोळीत फिल्मी स्टाइल राडा

पुणे : (Pune Crime News) राज्यात मागील अकरा दिवसांपासून गणेशत्सव सण साजरी होत आहे. कालपासून मोठ्या थाटामाटात अन् उत्साहात आपल्या लाडक्या बाप्पाला गणेश भक्तांनी निरोप दिला. मात्र, पुण्यात अद्यापही महत्त्वाच्या बाप्पांचे विसर मिरवणुका सुरु आहेत. अशा अतिशय आनंदाच्या वातावरणात, पुण्यात दोन मंडळात तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरामुळे गणोशत्सावाला गालबोट लागला आहे.

हा सगळा प्रकार पुण्याच्या सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला. शेंडी टोळी अन् सूर्या टोळीमध्ये जुना वाद खूप दिवसांपासून चालत आला आहे. या दोन टोळीचे दोन गणेश मंडळ पुण्यातल्या तळजाई वसतिगृह परिसरात आहे. त्यामुळे कोणत्याही कारणावरून नेहमीच वाद आणि मारामारी होत असते. असाच प्रसंग काल गणेश विसर्जनादरम्यान घडला.

या दोन गटात वाद एवढा पेटला की, हातात मिळेल त्या वस्तूने एकमेकांच्या विरोधात वार प्रतिवार सुरू होते. त्यानंतर एकमेकांना रस्त्यावर पडलेल्या दगडं फेकून मारत होते. मात्र, यामध्ये गणेश विसर्जनासाठी आलेल्या महिला आणि लहान मुले गंभीर जखमी झाले आहेत. धक्कादायक प्रकार म्हणजे घटनास्थळी सहकारनगर पोलीस स्टेशनमधील एकही पोलीस कर्मचारी हजर नव्हता.

या घटनेनंतर प्रश्न उपस्थित होत आहे की, घटनास्थळी एकही पोलीस कर्मचारी हजर का नव्हता? त्या ठिकाणी कुणालाही कार्यरत करण्यात का आलं नव्हतं? उत्सवादरम्यान असे प्रकार घडतील याची पूर्व कल्पना सहकार नगर पोलिसांना नव्हती का? अद्याप सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये या घटनेबाबत गुन्हेगारांवर गुन्हा का दाखल झालेला नाहीये? असे अनेक प्रश्न या गंभीर घटनेनंतर उपस्थित होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये