क्राईमपुणे

क्राईम : खंडणीला नकार दिल्याने हाॅटेलची तोडफोड करत, व्यावसायिकेची साखळी हिरावली; पोलीसांनी चांगलीच जिरवली..

पुणे : (Pune Crime News) शहरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. काल येरवडा परिसरात महिना ५ हजार रुपये खंडणी (Ransom Case) देण्यास नकार दिल्याने गुंडाने हॉटेलचालक महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोन्याची साखळी (Gold Chain) जबरदस्तीने हिसकावून घेतली. तर दुसऱ्या बाजूला याच वेळी गुंडाच्या साथीदारांनी हॉटेलमधील सामानाची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे.

दरम्यान, (Pune Crime News) याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Pune Police) अखिल अनिल पालांडे (वय २५, रा. माणिक कॉलनी, धानोरी गाव, विश्रांतवाडी) याला अटक केली आहे. ओंकार टिंगरे (वय २६) व त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी आहे की, 51 वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६१३/२३) दिली आहे. हा प्रकार विमाननगरमधील जे एम डी फास्ट फुड हॉटेलमध्ये (JMD Fast Food Hotel Vimannagar) बुधवारी सकाळी साडेआठ वाजता घडला.

गुन्हेगार आपल्या साथीदारांसह हॉटेलवर आला. त्याने त्यांना हाताने मारहाण (Beating) करुन त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची साखळी जबरदस्तीने ओढून घेतली, पैसे देत नाही ना तर साखळी घेऊन जातो, असे म्हणून तो हॉटेलच्या बाहेर जाऊ लागला. त्याच्या दोन साथीदारांनी हॉटेलवर ठेवलेले सर्व सामानाची तोडफोड करुन दर महिन्याला पैसे देत नाही ना, तुम्हाला बघून घेतो, सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर ते तिघे निघून गेले. पोलिसांनी गुंड अखिल पालांडे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक गायकवाड (PSI Gaikwad) तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये