पुणे हादरलं! नमाज पठणासाठी गेलेल्या 9 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार
पुणे | शहरात नऊ महिन्यांत बाललैंगिक शोषणाच्या 324 घटना घडल्या असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण दुपटीने वाढले आहे. गेल्या सहा वर्षांत दीड हजारांपेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनांमुळे शहरातील बालकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशातच पुण्याच्या कोंढवा (Pune Kondhwa News) परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. मशिदीमध्ये नमाज पठण करण्यासाठी गेलेल्या नऊ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे.
मशिदीमध्ये नमाज पठण करायला गेलेल्या नऊ वर्षाच्या मुलावर मशिदीतील कर्मचाऱ्याकडून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार (Pune Crime News) उघडकीस आला आहे. 10 नोव्हेंबर 2023 रोजी हा प्रकार घडला आहे. पीडित मुलाच्या मामाने याबाबत पोलीस ठाण्यात (Kondhwa Police) तक्रार दिल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकारानंतर संतापाची लाट उसळली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार मोहम्मद युसुफ असे गुन्हा दाखल असलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. आरोपीवर पोक्सो अंतर्गत (POCSO) कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाच्या मामाने ह प्रकार उघडकीस आल्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात याबाबत बुधवारी फिर्याद दिली आहे. सध्या पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपी सध्या फरार आहे.
नेमकं काय घडलं ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचा भाचा नमाज पठणासाठी का जात नाही याबाबत बहिणीला विचारले असता बहिणीने घडलेला धक्कादायक प्रकार मामाला सांगितला आहे. नऊ वर्षाचा पीडित हा 10 नोव्हेंबर रोजी कोंढवा येथील उस्मानिया मशिदीत त्याच्या मित्रासह नमाज पठणसाठी गेला होता. यावेळी नमाज झाल्यानंतर मित्रासह मशिदीत तो थांबला. यावेळी आरोपी तेथे आला व त्याने पीडित अल्पवयीन व त्याच्या मित्राला तो राहत असलेल्या मशिदतील त्याच्या खोलीत नेले. तिथे त्याने नमाज पठणाविषयी थोडी माहिती दिली. त्यानंतर त्याने पीडिताच्या मित्राला जाण्यास सांगितले. घडलेल्या घटनेनंतर सात दिवसांनी हा प्रकार समोर आला आहे. आरोपीवर पोक्सो अंतर्गत (POCSO) कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.