स्वत:च्या मृत्यूचा बनाव करणाऱ्या भामट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पुणे | कोथरूडमधून (Pune Crime News) एक खळबळजनक बातमी समोर आलीये. आपला मृत्यू झाल्याचा बनाव करणाऱ्या एका भामट्याला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. कारची चोरी करून पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झालेल्या चोरट्याचा वेगळाच प्रताप समोर आला आहे. कार चोरी केल्यानंतर त्याने पोलिसांना गुमराह करण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव केला होता. एवढेच नाही, तर मध्य प्रदेशातील एका स्थानिक वर्तमानपत्रात त्याने नातेवाईकांमार्फत स्वतःच्या मृत्यूचा बनाव बातमी छापून आणली होती.
वर्षभरापूर्वी त्या चोरट्याने कोथरूडमधील पौड परिसरातून दुचाकी चोरली होती. चोरी करून मिश्रा मूळगावी गेला. त्याने नातेवाईकांमार्फत स्वत:च्या मृत्यूची बातमी एका वर्तमानपत्रात छापून आणली होती. मिश्रा याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना प्राथमिक तपासात मिळाली होती. मात्र, त्याने केलेला कारनामा अखेर कोथरूड पोलिसांनी उघड केला आहे. वर्षभरापूर्वी कोथरूड भागातून मोटार चोरून पसार झालेल्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. तपासात चोरटा जिवंत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला पकडण्यात आले. विवेक मिश्रा (मध्य प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. मिश्रा याचे कोथरूड भागात पंक्चरचे दुकान होते. मोटारीच्या वाहन पाटीवरील क्रमांक बदलून तो पुण्यात आला असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्याकडून वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.