क्राईमताज्या बातम्यापुणे

सावधान! 50 रुपयांच्या नादात गमवावे लागतील लाखो रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण

पुणे | प्रत्येक लाईकसाठी तुम्हाला 50 रुपये मिळतील अशी ऑफर जवळपास प्रत्येक सोशल मीडिया युझरनं पाहिली असेल. अशा परिस्थितीत, काही लोक या ऑफरच्या जाळ्यात अडकले असतील, काही लोकांनी त्याकडे दुर्लक्षही केलं असेल. आजकाल अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवून ऑनलाइन पेमेंट करून लाखो रुपये गमावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अशीच घटना मगरपट्टा परिसरात घडली आहे.

मगरपट्टा येथील रहिवासी अय्यर यांच्या मोबाईलवर एक संदेश आला. परदेशातील मोबाईल क्रमांक किंवा वेगळ्याच क्रमांकाच्या मोबाईलवरून अशा प्रकारचे संदेश अनेक नागरिकांना मोबाईलवर येत आहेत. अय्यर यांनाही असाच ऑनलाइन टास्क पूर्ण करण्याबाबत हा संदेश आला होता.

चोरट्यांनी त्यांना टेलिग्रामवर लिंक पाठवली. टास्क पूर्ण केल्यानंतर पहिल्यांदा तीन हजार 700 रुपये दिले. त्यानंतर चोरट्यांनी अय्यर यांना दोन लाख ६० हजार रुपये बॅंक खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार अय्यर यांनी चोरट्यांनी दिलेल्या खात्यात पैसे भरले. परंतु परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अय्यर यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

वकिलाची 10 लाख रुपयांची फसवणूक

शेअर मार्केट ट्रेडिंग आणि आयपीओमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास चांगला मोबदला मिळेल, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका वकिलाला दहा लाख रुपयांना गंडा घातला. याबाबत सॅलिसबरी पार्कमधील योगेश यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी ऑनलाइन वर्ग घेउन त्यांना आयपीओत पैसे गुंतवणूक करण्याचे फायदे सांगितले.

व्यावसायिकाची फसवणूक

अन्य एका घटनेत ॲम्युनिशन फॅक्टरीचे अधिकारी असल्याचे सांगून चोरट्यांनी बाणेर येथील व्यावसायिकाची चार लाख 17 हजार रुपयांची फसवणूक केली. कुलिंग टॉवरचे काही भाग खरेदी करायचे आहे, असा संदेश मोबाईलवर पाठवला. त्यानंतर जैन यांनी पैसे भरले. परंतु फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये