Accident : ग्रामदैवताचं दर्शन घेऊन घरी परतत असतानाच काळ आला अन्…

भरधाव वाहन चालकांविरोधात वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई होत असतानाही वाहन चालकांमध्ये कायद्याची भिती नसल्याचे दिसात आहे. जड वाहनांमुळे रोड अपघातांची संख्यांमध्ये वाढ झाली आहे. दौंड तालुक्यातही अशीच एक अपघाताची घटना शनिवारी घडली आहे. या धडकेत 26 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. नेहल अप्पासाहेब गावडे असे अपघातात या तरुणाचे नाव आहे.
बिरोबावाडी येथील नेहल गावडे हा तरुण ग्रामदैवत असलेल्या बिरोबाच्या दर्शनासाठी गेला होता. दर्शन घेऊन दुचाकीवरुन घरी परतत असतानाच पाटस ते दौंड अष्टविनायक मार्गावर त्याच्या दुचाकीला भरधाव मर्सिडीजने धडक दिली. या धडकेत त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, तरुणाच्या मृत्यूची माहिती मिळताच बिरोबावाडी ग्रामस्थ संतप्त झाले. ग्रामस्थांनी मर्सिडीज कार पेटवून दिली. अष्टविनायक मार्गावरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. काही वेळाने विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली.