खळबळजनक! आर्थिक वादातून पतीने केली पत्नीची अन् मुलीची निर्घृण हत्या
पुणे | शहरात खून, खुनाचा प्रयत्न, सोनसाखळी चोरी, घरफोड्या यासारख्या गुन्ह्यांचे प्रमाण वेगाने वाढत वाढताना दिसत आहे. अशातच कात्रजमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आर्थिक आणि कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीचा आणि मुलीचा झोपेत त्यांच्यावर चाकूने वार करून तसेच हाताची नस कापून आणि उशीने तोंड दाबून हत्या केली आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.
भारती विद्यापीठ जवळील दत्तनगर येथे आज शनिवारी सकाळी उघडकीस हा प्रकार उघडकीस आला. श्वेता तळेवाले, शिरोली तळेवाले अशी खून झालेल्या आई आणि मुलीची नावे आहे. अजय तळेवाले (वय ४५) असे खून करणार्या आरोपी पतीचे नाव आहे. दरम्यान, खून केल्यावर आरोपी हा स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला. या प्रकरणी भरती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजय आणि पत्नी श्वेता यांच्यात आर्थिक विवंचनेतून गेल्या काही दिवसांपासून भांडणे होत होती. शुक्रवारी रात्री देखील दोघांमध्ये मोठे भांडण झाले. यानंतर या भांडणाला कंटाळून मुलीला घेऊन माहेरी जाईल असे श्वेता रागाने म्हणाली. याचा अजयला राग आला. भांडणानंतर श्वेता ही मुलीसोबत झोपली. दरम्यान, अजयने झोपलेल्या श्वेताच्या हाताची नस कापली. तिच्यावर चाकूने वार केला आणि तिचे आणि मुलीचे तोंड दाबून दोघींचा खून केला. मुलगी आईची बाजु घेत असल्याने अजयने तिची हत्या केली.