क्राईमपुणेशिक्षण

धक्कादायक! पुण्यातील FC काॅलेजमधील तरुणाची आत्महत्या; हॉस्टेलमध्ये घेतला गळफास..

पुणे : (Pune FC College Hostel Crime) शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असेलेल्या पुणे शहरातील फर्ग्युसन महाविद्यालयात (Fergusson College) शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या (Suicide) केल्याने एकच खळबळ उडाली आहे. बी.एससीच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या १९ वर्षीय ओम कापडणे या तरुणाने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपावले आहे. ओमने राहत असलेल्या वडारवाडी इथल्या विष्णू कुंज या वसतिगृहात (Hostel) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मुळचा नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी असलेला ओम कापडणे शिक्षणासाठी पुण्यात आला होता. फर्ग्युसन कॉलेजमध्ये विज्ञान शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. या घटनेची माहिती मिळताच ओम कापडणेला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारांपूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी रुग्णालयात तपासून त्याला मृत घोषित केलं.

ओमने आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. शिवाय वसतिगृहात ज्या खोलीत त्याने गळफास घेतला तिथे कोणतीही चिठ्ठी आढळून आलेली नाही. त्यामुळे ओमने हे पाऊल का उचलले याबाबत सध्या काहीही माहिती मिळू शकलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचं चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये