क्राईमताज्या बातम्यापुणे

नांदेड रस्त्यालगतच्या कारखान्याला भीषण आग! अग्नीशमन दलाची मेहनत पणाला..

पुणे : (Pune Fire News) शहरालगत असेलेल्या धायरी-नांदेड रस्त्यावरील एका कारखान्याला सकाळी बाराच्या सुमारास भीषण आग लागली. त्यामुळे परिसरात आगीचे लोट पसरले होते. हि माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्यासह बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, सरदरील खाजगी कारखान्यात एक बॅटरीचा कारखाना व दुसरा मशीनरीचे पार्ट तयार करण्याचा कारखाना आणि तिसरे एक छोटे युनिट जिथे पाणी पूरी संबंधित मटेरियल बनविले जाते अशा ठिकाणी आग लागली होती. बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले होते, त्यामुळे अग्नीशमन दलाला आग विझवण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले.

अग्नीशमन दलाच्या आफाट प्रयत्नानंतर तासभराने आग नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. दुपारी १ः30 वाजता आग पुर्णता विझली. पुणे अग्निशमन दलाकडून नवले, सिहंगड, काञज, वारजे, कोथरुड आणि मुख्यालयातून ०२ वाॅटर टँकर तसेच पीएमआरडीए कडून ०१ फायरगाडी व ०१ वाॅटर टँकर दाखल झाले होते. आग कशामुळे लागली हे अजून स्पष्ट झाले नाही. कारखान्याला आज सुट्टी असल्याने कोणी कामगार नव्हते. त्यामुळे कोणतीही जिवितहानी झाली नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये