क्राईमपुणेशिक्षण

पुण्याच्या विद्यार्थींनींच्या वसतिगृहात आग; शैक्षणिक साहित्य जळून खाक

पुणे : (Pune Fire News) रास्ता पेठेतील ताराचंद रुग्णालयामधील विद्यार्थिनींच्या वसतिगृहात आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, विद्यार्थिनींचे शैक्षणिक आणि इतर साहित्य जळून खाक झाले.

वस्तीगृहात आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या मुख्यालय आणि कसबा केंद्रातील बंब घटनास्थळी दाखल झाले. तीन मजली असलेल्या वसतिगृहात पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक चारमध्ये आग लागली होती.

जवानांनी प्रथम विद्यार्थिनी सुरक्षित असल्याची खात्री केली. या खोलीतील तीन विद्यार्थिनी आणि वसतिगृहातील इतर सर्वजण बाहेर आले होते. जवानांनी खोलीत आगीवर पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली. या घटनेत खोलीमधील शैक्षणिक साहित्य, लाकडी सामान व इतर वस्तू पूर्ण जळाल्या. खोलीमधील हिटरमुळे आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

आग लागल्याचे समजताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीही तेथे उपलब्ध असलेल्या १८ अग्निरोधक उपकरणांचा (फायर एक्स्टिंगविशर) वापरुन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये