ताज्या बातम्यापुणेसिटी अपडेट्स

मानाच्या मंडळांनी दिलेला शब्द पाळला; गेल्या वर्षीच्या तुलनेत 3 तास लवकर विसर्जन

पुणे | Pune Ganesh Visarjan 2023 – दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती विसर्जन (Ganesh Visarjan) उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. तर यंदा पुण्यातील (Pune) मानाच्या मंडळांनी मागच्या वर्षी दिलेला शब्द पाळत विसर्जन मिरवणुकीचं चित्र बदललं होतं. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पुण्यात तीन तास लवकर विसर्जन झाले. पुण्याच्या पाचही मानाच्या मंडळांच्या गणपतींचे सव्वाआठ तासांनंतर विसर्जन पार पडले.

विसर्जन मिरवणुकीला गेल्या वर्षी विलंब झाला होता, तर या विलंबाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पुढच्या वर्षी नक्कीच चित्र बदलेल, असा शब्द पुण्याच्या मानाच्या पाचही गणपती मंडळांनी दिला होता. तर यंदा या मंडळांनी त्यांनी दिलेला शब्द पाळल्याचं दिसलं. यंदा मिरवणुकीच्या वेळेत तीन तासांनी घट झाल्याचं पाहायला मिळालं.

श्री कसबा गणपतीची आरती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडली. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता महात्मा फुले मंडई टिळक पुतळ्यापासून विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. तर सायंकाळी 6 वाजून 45 मिनिचटांनी मानाच्या मंडळांची मिरवणूक संपली. यंदा मानाच्या मंडळांची विसर्जन मिरवणूक सुमारे साडेआठ तास चालली होती.

2022मध्ये कोरोनापश्चात मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक अकरा तास चालली होती. त्यावेळी पाचव्या मानाच्या गणपतीचे विसर्जन रात्री 8 वाजून 50 मिनिटांनी झाले होते. त्या पार्श्वभूमीवर यंदा मानाच्या मंडळांनी विसर्जन मिरवणूक लवकर संपविण्याची भूमिका जाहीर केली होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये