ताज्या बातम्यापुणे

प्राणी पाहण्यासाठी आता रांगेत उभं राहण्याची गरज नाही; पुण्यातील प्राणी संग्रहालयाची मोठी घोषणा

कात्रज | राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाला (Rajiv Gandhi Zoo) भेट देण्यासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरु झाले आहे. अनेक दिवसांपासूनची पर्यटकांची प्रतिक्षा अखेर संपली असून रांगेत उभे राहून तिकीट काढावे लागणार नसल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

उन्हाळी आणि दिवाळीच्या सुटीत प्राणी संग्रहालयात पर्यटकांची मोठी गर्दी असते. तिकिटांसाठी बराच वेळ रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे पालिकेने संग्रहालयाची तिकिटे ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची करण्याची मागणी होत होती. त्यानुसार या ऑनलाइन तिकीट बुकिंग सुविधेचे उद्‌घाटन महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त विकास ढाकणे यांच्या हस्ते नुकतेच झाले. उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे, प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव आदी या वेळी उपस्थित होते.

असे मिळेल ऑनलाइन तिकीट

महापालिकेने कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयासाठी https://punezoo.in ही वेबसाइट सुरू केली आहे. यावर प्राणी संग्रहालयाच्या माहितीसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंगची सुविधा आहे. पर्यटकांना या वेबसाइटवरील ऑनलाइन तिकीट या लिंकवर जाऊन आपली माहिती, तिकिटांची संख्या, मोबाइल क्रमांक; तसेच इतर आवश्‍यक माहिती भरल्यानंतर त्यांना ऑनलाइन तिकीट बुक करता येईल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये