ताज्या बातम्यापुणेरणधुमाळी

जागा भाजपची, अजित पवार गटाने शड्डू ठोकला, पुणे लोकसभेच्या निवडणुकीत ट्विस्ट

पुणे : (Pune Loksabha By Election) पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्याचे निर्देश काल (१३ डिसेंबर) मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. पुणे लोकसभेचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर पुण्यातील सर्वच पक्ष पोटनिवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. प्रामुख्याने थेट लढत असणाऱ्या भाजप आणि काँग्रेसने या पोटनिवडणुकीची तयारी जोरात केली आहे. परंतु आश्चर्यकारकरित्या अजित पवार गटाने देखील या पोटनिवडणुकीत उडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

अजित पवारांनी महायुतीत जर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मागितली तर आपण लोकसभेची पोटनिवडणूक लढू, असं अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी स्पष्ट सांगितलं आहे. राजकीय जीवनात कोणतेही पद हे कायमस्वरूपी नसते. परिवर्तन हा नियतीचा नियम आहे. त्यामुळे अजितदादांनी जर पुण्याची जागा मागायची ठरवलं तर लोकसभेचा उमेदवार हा दीपक मानकर असेल. त्यामुळे असं समजू नये की ही जागा भाजपलाच मिळेल, असं दीपक मानकर म्हणाले आहेत.

शेवटी शिरस्त नेते मंडळींना हा निर्णय घ्यायचा आहे. अजितदादा जो निर्णय घेतील तसा पक्ष चालेल. मी इच्छुक असताना माझ्या खासदारकीसाठी जी ताकद वापरणार होतो ती ताकद महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे लावेन, असं सांगायला देखील मानकर विसरले नाहीत. दीपक मानकर यांच्या भूमिकेमुळे पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीत नवी रंगत आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये