ताज्या बातम्यापुणे

दरोडेखोरांचा प्लॅन फसला; दागिने लुटण्याचा प्रयत्न चालू असतानाच पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मंचर | दिवाळीपूर्वीच चोरट्यांनी शहरात दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर येथील उत्तमभाग्य ज्वेलर्सवर बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास दरोडा टाकण्यात आला. मात्र पोलीसांनी अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी पोहोचून पाच जणांना अटक केली आहे.

काय प्रकार घडला?

मंचर येथील उत्तमभाग्य ज्वेलर्समध्ये बुधवारी पहाटे तीन वाजता सात जण घुसले. काही हत्यारांचा वापर करत त्यांनी शटर उघडून दुकानात प्रवेश केला. या घटनेची कुणकुण शेजारी राहणाऱ्या नागरिकांना लागली. त्यांनी त्वरित पोलिसांना फोन केला. पोलिसांना फोन आल्यानंतर पाच मिनिटात पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सोने, चांदीचे दागिने बॅगमध्ये भरत असताना पाच जणांना पकडले. मात्र दोन दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पळून गेले.

साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

त्या दरोडेखोरांकडून साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याचबरोबर कोयते, गॅस कटर व इतर हत्यारे हस्तगत करण्यात आली आहे. या घटनेते दोघे जण पळून गेले. त्यांच्या शोधासाठी टीम रवाना झाली आहे. त्यांच्याकडे काय मुद्देमाल आहे का? हे त्यांना पकडल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

https://x.com/jitendrazavar/status/1722162111424372878?s=20

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये