वर्षाच्या सरतेशेवटी पुणे हादरलं! कपडे धुण्यासाठी बोलावून अल्पवयीन मुलीवर तीन वेळा बलात्कार
पुणे | वर्षाच्या सरतेशेवटी शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका सतरा वर्षीय मुलीला घरी कपडे धुण्याच्या बहाण्याने बोलावून घेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली. या प्रकरणात पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पीडित मुलीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी आरोपी सुदर्शन शेरमाळे या आरोपीवर विनयभंग आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर महिन्यात तीन वेगवेगळ्या दिवशी घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
माहितीनुसार, आरोपी मूळचा नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील आहे. तो नोकरी निमित्त पुण्यात स्थायिक झाला असून, हांडेवाडी परिसरात एकटा राहतो. आरोपीने पीडित मुलीला नोव्हेंबर महिन्यात त्याच्या घरी कपडे धुण्याचे काम करण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर त्याने पीडित मुलीसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. हा प्रकार तीन वेळा घडला. अधिक तपास सहायक निरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहेत.