ताज्या बातम्यापुणेसिटी अपडेट्स

पुणेकरांना दिलासा! पाण्याची चिंता मिटली, खडकवासला धरण 100 टक्के भरलं

पुणे | Pune News – गेल्या काही दिवसांपासून पुणेकरांना (Pune) पाण्याची चिंता सतावत होती. पण आता पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस (Pune Rain) सुरू आहे. त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. कारण खडकवासला धरण (Khadakwasala Dam) 100 टक्के भरलं असून पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या अन्य धरणांच्याही पाणीपातळीत वाढ झाली आहे.

खडकवासला धरण हे पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे मुख्य धरण आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण शंभर टक्के भरलं आहे. तर खडकवासला धरणासोबतच पानशेत, टेमघर, वरसगाव या धरणक्षेत्रातही मोठा पाऊस झाला असून ही धरणं देखील शंभर टक्के भरली आहेत.

सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात तीन टक्कांनी वाढ झाली आहे. तर हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये