कोयता गँगच्या हल्ल्यात विद्यार्थी जखमी; पुण्यातील या नामवंत शाळेतील ही घटना

पुणे | शहरात कोयता गँगचा (Pune Koyta Gang) दहशत अजून सुरूच आहे. कालपर्यंत रस्त्यावर कोयता हातात घेऊन फिरणारी ही गँग आता महाविद्यालयात घुसली आहे. पुण्यातील नुतन मराठी विद्यालय (नुमवि) या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. विद्यालयात शिकणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्यावर तरुणांनी हल्ला केला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ला झालेल्या विद्यार्थी जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.
नेमके काय घडले ?
समीर पठाण आणि विजय आरडे अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. समीर पठाण याच्या मैत्रिणीशी विजय आरडे बसस्टॉपवर बोलत होता. आपल्या मैत्रिणीशी बोलतो याचा राग समीरला आला आणि त्याने विजयवर कोयता उगारला. या हल्ल्यात शेजारी असलेल्या विद्यार्थ्याला देखील गंभीर दुखापत झाली आहे. वार झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली त्यानंतर जवळच असलेल्या वाहतूक पोलिसांनी जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले.