ताज्या बातम्यापुणे

पुण्यात ऐन दिवाळीत अग्नितांडव; अग्निशमन विभागाकडून धक्कादायक आकडेवारी समोर

पुणे | दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीत शहरात (Pune News) अनेक ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. परिसरातील नागरिकांनी तत्काळ दाखविलेल्या समयसूचकतेमुळे आणि अग्निशमन विभागाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळणे शक्य झाले. पुण्यात काल रात्री 12 पर्यंत तब्बल 23 ठिकाणी आगीच्या घटनांची नोंद झाली आहे. या 23 घटनांमध्ये कुठेही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

पुण्यातील शुक्रवार पेठेत फटाक्यामुळे जुन्या वाड्याला आग लागली होती. वाडा लाकडी असल्यामुळे फटाक्यांच्या ठिणग्यांनी रौद्ररूप धारण केलं. सुदैवाने या वाड्यात कोणीही वास्तव्यास नव्हते. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. तर दुसरीकडे आपला मारुती मंदिराजवळील झाडाला देखील फटाक्यांमुळे आग लागली होती. धानोरी येथील विठ्ठल मंदिर येथे गवताला आग लागली होती. (Pune Fire News)

12 नोव्हेंबर रोजी राञी 7:00 वाजेपासून ते दि. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:00 अशा गेल्या 12 तासात 27 ठिकाणी आग लागल्याची नोंदी अग्निशमन दल नियंत्रण कक्षाकडून मिळत आहेत. फटाक्यांमुळे आगीच्या 27 घटनांची नोंद असून आत्तापर्यंत कोठे ही जखमी वा जिवितहानीची माहिती नाही.

पुण्यात कुठे घडल्या आगीच्या घटना ?

1) वेळ राञी 7:38 – रास्ता पेठ, के ई एम हॉस्पिटल जवळ एका इमारतीत टेरेसवर आग

2) वेळ राञी 7:40 – कोथरुड, सुतार दवाखान्या जवळ दुकानामध्ये आग

3) वेळ राञी 8:18 – वडारवाडी, पांडवनगर पोलिस चौकीजवळ घरामध्ये आग

4) वेळ राञी 8:24 – कोंढवा बुद्रुक पोलिस चौकीसमोर कचरयाला आग

5) वेळ राञी 8:50 – नाना पेठ, चाचा हलवाई जवळ इमारतीत दहाव्या मजल्यावर घरामध्ये आग

6) वेळ राञी 8:52 – घोरपडी पेठ, आपला मारुती मंदिराजवळ झाडाला आग

7) वेळ राञी 8:57 – कोंढवा, शिवनेरी नगर येथे इमारतीत टेरेसवर आग

8) वेळ राञी 8:58 – वारजे, आदित्य गार्डन, फ्लोरा सोसायटीत घरामध्ये आग

9) वेळ राञी 9:00 – शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर वाड्यामध्ये आग

10) वेळ राञी 9:13 – केशवनगर-मुंढवा रस्ता, गुडविल सोसायटीत घरामध्ये आग

11) वेळ राञी 9:27- आंबेगाव पठार, चिंतामणी शाळा येथे भंगार दुकानामध्ये आग

12) वेळ राञी 9:31 – शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर तिसरया मजल्यावर आग

13) वेळ राञी 9:32 – गुरुवार पेठ, कृष्णाहट्टी चौक येथे दुकानामध्ये आग

14) वेळ राञी 9:50 – हडपसर, रासकर चौक येथे एका घरामध्ये आग

15) वेळ राञी 9:51 – पिसोळी, खडी मशीन चौक येथे अदविका फेज १ येथे घराच्या गॅलरीमध्ये आग

16) वेळ राञी 10:08 – रास्ता पेठ, आगरकर शाळेजवळ छतावर कागदाला आग

17) वेळ राञी 10:09 – लोहगाव, शिवनगर, वडगाव शिंदे रोड इमारतीत गॅलरीमध्ये आग

18) वेळ राञी 10:23 – विश्रांतवाडी, सिरीन हॉस्पिटल जवळ इमारतीत गॅलरीत आग

19) वेळ राञी 10:28 – वडारवाडी, पांडव नगर येथे घरामध्ये आग

20) वेळ राञी 10:34 – धानोरी, विठ्ठल मंदिर येथे गवताला आग

21) वेळ राञी 10:43 – गुरुवार पेठ, मामलेदार कचेरी जवळ घरामध्ये आग

22) वेळ राञी 10:52 – बी टी कवडे रोड, सोलेस पार्कसमोर घरामध्ये आग

23) कोंढवा, शिवनेरी नगर, ब्रम्हा एवेन्यू सोसायटी येथे गच्चीवर टॉवरला आग

राञी 12 नंतर घडलेल्या घटना

24) वेळ राञी 12:38 – गुरुवार पेठ, गोरी आळी येथे वाड्यामध्ये आग

25) वेळ राञी 10:05 – रास्ता पेठ, अपोलो थिएटर जवळ इमारतीत बाल्कनीमध्ये आग

26) वेळ राञी 2:06 – औंध, आंबेडकर चौक येथे कचरयाला आग

27) वेळ राञी 3:14 – बुधवार पेठ, तपकीर गल्ली दुकानामध्ये आग

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये