क्राईमताज्या बातम्यापुणे

पुण्यात पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ!

पुणे | शहरातील कोरेगाव पार्क परिसरातील लेन क्रमांक 7 मध्ये एका पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत पुणे शहर नियंत्रण कक्षाला आज सकाळी साडेदहा ते आकरा वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली. दत्तात्रय कुरळे असे मृतावस्थेत सापडलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

कुरळे हे पुणे पोलिसांच्या मोटार परिवहन विभागात (एमटी) नियुक्तीस होते. पोलीस दलात ते शिपाई म्हणून भरती झाले होते. पदोन्नतीने ते उपनिरीक्षक झाले होते. शनिवारी सकाळी कोरेगाव पार्कमधील गल्ली क्रमांक सात परिसरात कुरळे मृतावस्थेत सापडले. सुरुवातीला पोलिसांना त्यांची ओळख पटली नाही. त्यांच्याकडे असलेल्या ओळखपत्रावरुन ते पुणे पोलीस दलात उपनिरीक्षक असल्याचे उघडकीस आले.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी घटनास्थळी भेट दिली. कुरळे यांच्या मृत्यूमागचे कारण समजू शकले नाही. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूमागचे कारण समजेल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये