पुणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका; 32 वर्षे रखडलेला प्रश्न चक्क नऊ तासांत सुटला
पुणे | Pune News – पुणेकरांची (Pune) आता वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. 32 वर्षे रखडलेल्या मगरपट्टा-खराडी रस्त्यावरील मुंढवा चौकातील रस्ता रूंदीकरणाचा प्रश्न महापालिका प्रशासानानं मध्यरात्री कारवाई करून सोडवला. मुंढवा चौकात अरूंद रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. पण आता तेथील रस्त्याचे रूंदीकरण करण्यात आलं असून पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
मुंढवा उड्डाणपुलापासून ते मुंढव्यातील महात्मा फुले चौकापर्यंत रस्त्याच्या कडेला जागामालकांनी तो रस्ता अडवला होता. त्यामुळे गेल्या 32 वर्षांपासून हे रूंदीकरण रखडलं होतं. तसंच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. तर मुंढवा चौकात अरूंद रस्त्यामुळे एकाच मार्गिकेवरून वाहतूक सुरू होती.
महापालिका प्रशासनानं ही समस्या सोडवण्यासाठी कठोर पाऊल उचललं. महापालिकेनं कारवाई करत शुक्रवारी मध्यरात्री जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण जमीनदोस्त केले. या कारवाईवेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे उपस्थित होते.