आरोग्यताज्या बातम्या

सीरम इन्स्टिट्यूट आले वैद्यकीय क्षेत्रासाठी धावून; JN.1 व्हेरियंटवर लवकरच काढणार लस

Corona JN.1 Variant Update : कोरोनाच्या भयावह आठवणी विस्मृतीत जात असतानाच नव्या व्हेरिएंटने टेन्शन वाढवलं आहे. या विषाणुमुळे देशात पहिला बळीही गेला आहे. कोविडचा नवीन प्रकार भारतात आल्याचे समोर आले आहे. JN.1 विषाणूची पहिली केस केरळमध्ये नोंदवली गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. अशा परिस्थितीत पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुन्हा एकदा मदतीला धावून आले आहे. भारत सरकारने परवाना दिल्यानंतर JN.1 नव्या व्हेरियंटवरील लस लवकरच रुग्णांसाठी उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी भारत सरकारकडे अर्ज केल्याचं म्हटलं आहे, मनीकंट्रोलने आपल्या अहवालात यासंदर्भात माहिती दिली आहे.

सीरम इन्स्टिट्यूट सध्या कोविड -19 च्या XBB1 च्या प्रकारावर लस उपलब्ध करून देते. XBB1 आणि JN.1 या नव्या व्हेरियंटमध्ये फारसा फरक नाही. या व्हेरियंटवर ही लस प्रभावी ठरू शकते. तसेच येत्या महिनाभरात JN.1 वरील लस रुग्णांसाठी उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी भारत सरकारकडे अर्ज केला आहे, अशी माहिती सीरमच्या प्रवक्त्याने दिली आहे.

JN.1 चा व्हेरियंट सापडल्यानंतर पुन्हा एकदा सीरम इन्स्टिट्यूट वैद्यकीय क्षेत्रासाठी धावून आले आहे. शुक्रवारी देशात ६४० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. देशभरात सक्रिय रुग्णांची संख्या २९९७ वर पोहोचली आहे. ज्यात JN.1 च्या रुग्णांची संख्या अधिक असून सध्या यावर लस उपलब्ध नाही.

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून मृतांची संख्या ५,३३,३२८ वर पोहोचली आहे. केरमध्ये शुक्रवारी ८ पर्यंत आणखी एका मृत्यूची नोंद झाली आहे. सध्याचा मृत्यदर १.१९ टक्के असून आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. भारतात कोविड-१९ लसीचे २२०.६७ कोटी डोस देण्यात आले आहेत. दरम्यान भारत सरकार आणि तज्ज्ञांनी सावधगिरी बाळगण्याचा आणि स्वच्छता राखण्याचा सल्ला दिला आहे. सतेच सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याच्या सूचना केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये