लोणावळ्यातील व्हीलामध्ये चालायचे पॉर्नचे शुटींग; पोलिसांनी असा लावला शोध
पुणे | पॉर्न व्हिडिओ तयार करण्यास बंदी असतांना देखील लोणावळा येथे एक व्हीला भाड्याने घेत काही ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी पॉर्न व्हिडिओ तयार करणारे रॅकेट पुणे ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. ही टोळी वेगवेगळ्या राज्यांतून आली असून काही तरुण आणि तरुणी या ठिकाणी पॉर्न व्हिडिओ तयार करत होते. यातील काही व्हिडिओ पोलिसांना मिळाले असून १५ पैकी १३ जणांना अटक करण्यात आली आहे.
भारतात पॉर्न व्हिडिओ तयार करणे कायद्याने गुन्हा आहे. लोणावळ्यात एका व्हीलात पॉर्न व्हिडिओ तयार करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यात परदेशातील टोळी सक्रिय असल्याची देखील पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाली. या ठिकाणी काही अश्लील ओ.टी.टी प्लॅटफॉर्मसाठी दुसऱ्या राज्यातून आलेले तरुण व तरुणी हे पॉर्न व्हिडिओ तयार करत होते.
दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने या व्हीलावर छापा टाकला. यावेळी या ठिकाणी १५ जणांची टोळी पॉर्न व्हिडिओ तयार करत असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले असून यातील १३ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी पाच तरुणी आहेत. हे सर्व भारतातील विविध राज्यांतील आहेत.
या प्रकरणी विश्णु मुन्नासाहब साओ (वय-30, रा.16 परगना, कोलकत्ता), जावेद हबीबुल्ला खान (वय-35, रा. आहरा उमरी, जि. बस्ती, उत्तरप्रदेश), अलका राज के राजन (वय 23, रा. आरपी, साउथ वेस्ट दिल्ली), नेहा सोमपाल वर्मा (वय 38, रा. गणेशपुरी, मुजफानगर, उत्तरप्रदेश), रिया वासु गुप्ता (वय 21, रा.लक्ष्मीनगर, शखरपुर, दिल्ली), बुध्दसेन बरदानीलाल श्रीवास (वय-29, रा. महाकाली कॉलनी, चंद्रपुर), समीर मेहताब आलम (वय 26, रा. अमरोहा, राईड मॉक्सी, उत्तरप्रदेश), अनुप मिथीलेष चौबे (वय 29, रा. काशीबाई चाळ कांदिवली ईस्ट, मुंबई), रामकुमार श्रीभगवान यादव (वय 21, रा. रोनक सिटी, शाम कॉलनी, हरियाणा), विना भारत पोवळे (वय 32, रा. केंगार चाळ, खोपट, ठाणे), मैनाज जाहीद हुसेन खान (वय 28, रा. सनसिटी, नालासोपारा वेस्ट, जि. पालघर), राहुल सुरेश नेवरेकर (वय 38, रा. मोहनचाळ, वागळे इस्टेट, ठाणे), अनिकेत पवन शर्मा (वय 19, व्यवसाय मेकअप आर्टीस्ट, रा. रूद्राक्ष रेसिडेन्सी, पलसाना, सुरत, राज्य गुजरात), वंशज सचीन वर्मा (वय 21, रा. डेहराखास, डेहराडुन), मनीश हिरामण चौधरी (वय 20, रा. शास्त्रीनगर, हरीयाणा) यांच्यासह बंगला चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.