ताज्या बातम्यापुणे

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; विद्यापीठ चौकातील वाहतुकीत आजपासून मोठे बदल

पुणे : पुण्यात मेट्रोची कामे वेगाने सुरू आहे. पुणे विद्यापीठ आचार्य आनंद ऋषी चौकात मेट्रो आणि एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. या साठी रस्ते खोदाई करण्यात येत असून या कामामुळे आजपासून (10 नोव्हेंबर) विद्यापीठ चौकातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. औंधकडून शिवाजीनगरकडे येणाऱ्या दुचाकीचालकांना आता सकाळी आठ ते रात्री आठ दरम्यान मिलेनियम गेटमधून प्रवेश करून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडावे लागणार आहे. मेट्रोच्या उड्डाणपुलाचे काम होईपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामध्ये मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी मेट्रोचे खांब व उड्डाणपुलासाठीचे खांब उभारण्यासाठी रस्ता खोदई व बॅरिकेडींग करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक शाखेचे उपायुक्त विजय मगर यांनी चौकातील वाहतूक बदलाचा आदेश काढला आहे. हा वाहतूक बदल विद्यापीठ चौकातील पुलाचे व मेट्रोचे बांधकाम संपेपर्यंत अंमलात राहणार असल्याचे पोलिसांनी आदेशात म्हटले आहे.

असे असतील वाहतूक बदल…

  • औंधवरून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या दुचाकीचालकांनी मिलेनियम गेट (चतुःश्रृंगी पोलिस ठाणे) मधून विद्यापीठामध्ये प्रवेश करावा. मुख्य गेटमधून बाहरे पडावे. (वेळ दररोज सकाळी आठ ते रात्री आठ)
  • सर्व प्रकारच्या मिनी बस, बस (पीएमपी, खासगी बस) यांनी मेट्रोकामाच्या डाव्या बाजूच्या लेनचा वापर करावा.
  • तीनचाकी व चारचाकी वाहनचालकांनी उजव्या बाजूच्या लेनचा वापर करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये