मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षापासून वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. वाहतूक कोंडीमुळे शहरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. यामुळे या शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे बाबत बोलायचं झालं तर शहरात सध्या स्थितीला दोन मेट्रो मार्ग कार्यान्वित आहेत.
वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट यापैकी पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट हे २ मेट्रो मार्ग सुरु आहेत. अशातच पुणे मेट्रो संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महा मेट्रोने आता वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली हे विस्तारित मेट्रो मार्ग विकसित करण्याचा प्लॅन आखला आहे.
यातील वनाज ते चांदणी चौक या मार्गावर दोन आणि रामवाडी ते वाघोली या मार्गावर ११ स्थानके विकसित होणार असून या स्थानकांच्या डिझाईनचे काम केले जाणार आहे. यातील रामवाडी ते वाघोली हा ११.३६ किलोमीटरचा मार्ग आहे आणि वनाज ते चांदणी चौक १.१२ किलोमीटर लांबीचा मार्ग आहे.
या दोन्ही प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. तसेच आता या दोन्ही मार्गावरील तेरा स्थानकांसाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या दोन्ही प्रकल्पांना राज्य शासनाने या चालू वर्षातच मान्यता दिली आहे. ११ मार्च २०२४ ला या दोन्ही प्रकल्पांना राज्य सरकारकडून मंजूरी देण्यात आली आहे.
दरम्यान आता या दोन्ही मेट्रो मार्गावरील तेरा स्थानकांसाठी सल्लागार नियुक्त केला जाणार आहे. यासाठीची निविदा सुद्धा काढण्यात आली आहे. ७ ऑगस्टला ही निविदा काढण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे तीन हजार 756 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार अशी माहिती समोर आली आहे.
मात्र अद्याप या प्रकल्पाला केंद्राची मंजुरी मिळालेली नाही. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर या प्रकल्पाच्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे. तथापि केंद्रातील सरकार लवकरच या प्रकल्पाला मंजुरी देईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
यामुळे भविष्यात पुणे शहरातील मेट्रोचे जाळे आणखी विस्तारणार आहे. यामुळे शहरातील नागरिकांचा प्रवास हा आधीच्या तुलनेत आणखी सोयीचा आणि जलद होणार आहे. हे दोन्ही प्रकल्प शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गेम चेंजर सिद्ध होणार अशी आशा आहे.
पण, या प्रकल्पांना महाराष्ट्र राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतरही केंद्राकडून मंजुरी मिळत नसल्याने या प्रकल्पाला केंद्र सरकार कधीपर्यंत मंजुरी देणार हा मोठा यक्षप्रश्न आहे. मात्र, केंद्र सरकारची मंजुरी मिळाली की या प्रकल्पाच्या प्रत्यक्षात बांधकामाला सुरुवात होणार अशी माहिती महा मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी व्यक्त केली आहे.