पुनीत बालन शनिवार वाडा घेणार दत्तक !
केंद्रीय पुरातत्त्व विभागाने देशभरातील प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळांच्या संवर्धनासाठी ‘ ऍडॉप्ट ऑफ द हेरिटेज ‘ ही योजना जाहीर केली , त्यामध्ये पुण्यातील चार प्राचीन स्थळांचा समावेश असून त्यामधील शनिवार वाडा ही वास्तू आणि त्याचा संपूर्ण परिसर पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून दत्तक घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
उद्योजक पुनीत बालन यांनी राष्ट्र संचारच्या प्रतिनिधीशी बोलताना याबाबत अप्रत्यक्ष दुजोरा देत अशा प्रकारचा विचार सुरू असल्याचे संकेत दिले.
चौथ्या राज्यस्तरीय परिवर्तन युवा परिषदेच्या निमित्ताने श्री बालन यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने चर्चा केली. याबाबत तसा प्राथमिक विचार आपल्या मनात आला असून याबाबत विस्तृत माहिती घेत आहे असे त्यांनी सांगितले.
पुण्यातील पाच वारसा स्थळांचा समावेश ऍडॉप्ट द हेरिटेज या संकल्पनेमध्ये करत केंद्रीय पुरातत्त्व विभागाने ही स्थळे विकसित करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये शनिवार वाडा सह आगाखान पॅलेस , पाताळेश्वर लेण्या आदींचा समावेश आहे .
गेल्या अनेक वर्षांपासून पुनीत बालन हे पुण्याच्या विकासामध्ये आणि विशेषतः गणेशोत्सवातील गणेश मंडळांना बळ देण्यामध्ये विशेष भूमिका बजावत आहेत. जम्मू काश्मीर मध्येही त्यांचे काम सुरू आहे.
बारामुल्ला सहित काही ठिकाणी त्यांनी लष्करी स्कूल ला कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत त्यांनी पहाडी काश्मिरी मुलांमध्ये भारतीय रूजविण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.
एस बालन ग्रुप आणि माणिकचंद आदी कंपन्यांच्या माध्यमातून सीएसआर निधी अंतर्गत ते अनेक विकास प्रकल्प राबवत आहेत. येथील वारसा स्थळे दत्तक घेतले तर खाजगी निधी आणि देखरेखी च्या माध्यमातून या स्थळांचा विकास होईल आणि त्यांचे प्रोफेशनल मार्केटिंग मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची संधी साधने शक्य होईल.
मराठी इतिहास आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्याची संधी : पुनीत बालन
वारसा स्थळे दत्तक देण्याचा हा निर्णय मला मनापासून आवडला . कुठल्याही गोष्टींमध्ये प्रोफेशनल टच असल्याशिवाय गोष्टी मोठ्या होणार नाहीत. समाजसेवा आणि व्यवसाय याच्या संयोगातून एक नैतिक आणि अर्थसंपन्न राष्ट्र घडू शकते . बालन ग्रुपला सचोटीची समाजसेवा आणि उद्योजकीय सामर्थ्याचा अनुभव आहे . पुण्याचा हा गौरव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी लाईट अँड साऊंड शो , छत्रपती आणि पेशव्यांचा इतिहासाची चलचित्रे , त्याचे ऑडिओ व्हिज्युअल स्क्रिनिंग, हेरिटेज वॉक असे अनेक उपक्रम करता येणे शक्य आहे . देशभरातील पर्यटकांसह आंतरराष्ट्रीय टुरिस्ट याकडे कसा आकर्षित होईल , यासाठी सध्या माझ्या मनात नवनवीन कल्पना आकारास येत आहेत.