पुणेरी दणका! गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांना घडवली जन्माची अद्दल
आजोबांचा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही
पुणेरी दणका! गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांना घडवली जन्माची अद्दल,आजोबांचा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाहीपाट्या जगात प्रसिद्ध आहेत. त्यासोबतच पुणेकर तिरकस स्वभाव आणि टिप्पणीसाठीही ओळखले जातात. कमीत कमी शब्दात समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान हा पुणेकरांकडूनच होऊ शकतो. पुणेरी पाट्या आणि पुणेकरांचे किस्से यांची नेहमीच चर्चा होते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका पुणेकराच्या व्हिडिओची चर्चा होत आहे.
पुणेरी पाट्यांमुळे पुण्याची वेगळी ओळख आहे. त्यातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा दिसून येतो आणि त्यातून समोरच्याला थेट इशाराही असतो. अशीच एक पाटी एका फाटकावर लागली होती. ‘गेटसमोर वाहन पार्क करु नका, असे केल्यास टायरमधील हवा काढण्यात येईल’, एका कार चालकाने या पाटीकडे आणि त्यातील इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत कार गेटसमोर पार्क केली. बरं ही पाटी काही पुण्यातील कोणत्याही उपनगरात नाही तर सदाशिवपेठेतील एका घरासमोरील फाटकावर लावलेली होती, याची तरी काळजी कार चालकाने घेणं गरजेचं होतं. पण नाही, कार चालकाने ‘गेटसमोर वाहन पार्क करु नका…’ पाटीसमोरच कार आणून उभी केली. त्याचा पूर्वानूभव कदाचित त्याला या कृतीसाठी प्रोत्साहन देत असेल पण ही पुण्यातील पाटी आहे, हेही त्याने लक्षात घेतले नाही. मग काय, त्याला अद्दल घडवलीच पाहिजे असं ठरवूनच एका आजोबांनी त्याच्या मग्रूरीची आणि त्याच्या कारच्या टायरचीही हवा काढली.
बेशिस्त पार्किंग हा आपल्याकडे तसा नवा विषय नाही. तो एवढा गुळगुळीत झाला की त्यावर कोणी चर्चाही करत नाही. कधीतरी ट्रॅफिक पोलिसांना जाग आली तर नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई केली जाते, टो करून चारचाकी वाहने घेऊन जाता. मात्र दुचाकींवर ही कारवाई अतिघाईने सुरु असलेली आपल्याला दिसते. असे असले तरी नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणे बंद होत नाही. याच सवयीचा गुलाम असणाऱ्या कार चालकाने आजोबांच्या घरासमोर कार पार्क केली. हे ठरले पुणेरी आजोबा. त्यांनीही फाटकवार लावलेल्या पाटीप्रमाणे कृती करुनच दाखवली. कारच्या मागच्या टायरची हवा काढली. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमधील कॅप्शननुसार ही घटना सदाशिव पेठेतील असल्याचे सांगितले जात आहे. माय महानगर त्याची पुष्टी करत नाही. अजोबा कारच्या चाकातील हवा काढत असताना कोणीतरी हा व्हिडिओ तयार केला आणि चांगली अद्दल घडवली म्हणून आजोबांचे सोशल मीडियावर कौतूक होत आहे.