क्रीडाताज्या बातम्या

पी. व्ही. सिंधूनं गाजवलं मैदान! सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात चीनच्या वांग झि यिवर पडली भारी

नवी दिल्ली | PV Sindhu Wins Singapore Open Title – भारताची सुपरस्टार आणि दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात बाजी मारली आहे. सिंधूनं चिनच्या वांग झी यीला पराभूत करत सिंगापूर ओपनच्या पदकावर आपलं नाव कोरलं आहे. पीव्ही सिंधूने रविवारी पार पडलेल्या सिंगापूर ओपन 2022 मधील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या वांग झी यीचा 21-9, 11-21, 21-15 असा पराभव केला आहे. या स्पर्धेनंतर सिंधू बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. 

सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात तिसऱ्या मानांकित पीव्ही सिंधूनं वांगविरुद्ध पहिला सेट एकतर्फी जिंकला. त्यानंतर दुसरा सेट जिंकून वांगनं पुनरागमन केलं. मात्र, अखेरच्या सेटमध्ये पीव्ही सिंधूनं बाजी मारली. सिंधूनं सिंगापूर ओपनचे सुपर 500 विजेतेपद पटकावून कॉमेनवेल्थ गेम्सपूर्वी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पीव्ही सिंधूचं हे तिसरं पदक आहे. यावर्षी तिनं आशियाई चॅम्पियनशिपमध्ये प्रथम कांस्यपदक जिंकलं. त्यानंतर सय्यद मोदी इंटरनॅशनल आणि स्विस ओपनचे विजेतेपदही पटकावलं होतं.

दरम्यान, सिंधूने उपांत्य पूर्व फेरीत जपानच्या सायना कावाकामीचा पराभव केला होता. सिंधूने हा सामना 21-15, 21-7 असा सरळ सेटमध्ये जिंकला. यावर्षी सिंधूनं सयेद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि स्विस ओपन अशी दोन सुपर ३०० पदकं जिंकली आहेत. त्यानंतर सिंगापूर ओपनचं तिसरं पदकही तिने आपल्या नावावर केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये