
पुणे : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या पाहुणे असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात आज सायंकाळी जोरदार राडा झाला. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी काही महिला कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचंही व्हिडिओमधून समोर आलं आहे.
दरम्यान, प्रत्यक्ष कार्यक्रम सुरु झाला तेव्हा राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या बालगंधर्व रंगमंदिरात आधीच बसल्या होत्या. त्यानंतर स्मृती इराणी बोलायल्या उठल्यानंतर त्याच्याकडून घोषणाबाजी सुरु झाली. त्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या एकमेकांना भिडले. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नलावडे यांच्यावर भाजपच्या एका कार्यकर्त्यांनं त्यांच्यावर हात उचलत मारहाण करण्यात आला. यानंतर पोलिसांनी सर्वांना आवरण्याचा प्रयत्न केला. पण यामुळं चांगलाच गोंधळ निर्माण झाला.
दरम्यान, जेडब्ल्यु मेरिएट हॉटेलला आम्हाला स्मृती इराणींना भेटू दिलं नाही, त्यामुळं आम्ही बालगंधर्व रंगमंदिरात शेवटच्या रांगेत जाऊन बसलो. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी अचानक घोषणाबाजी सुरु केली त्यानंतर आम्ही ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या घोषणा दिल्या. नंतर भाजपचे पुरुष कार्यकर्ते तिथं आले आणि त्यांनी आमच्यावर हल्ला केला. पोलिस तिथं असतानाही त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी जुमानलं नाही, अशी माहिती मारहाण झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या वैशाली नागवडे यांनी दिली.