Top 5ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“अजित पवार, देंवेंद्र फडणवीसांनी पुन्हा सरकार आणावं”

अहमदनगर – Radhakrishna Vikhe Patil on Government | राज्यात सध्या निवडणुकांमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. राज्यसभेची निवडणूक पार पडली त्यामध्ये शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला. आता विधान परिषदेची निवडणूक आहे. महाविकास आघाडी एकमेकांवर पलटवार चालू आहेत. अशातच भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी एक वक्तव्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस हे उत्तम प्रशासक आणि स्ट्रेट फॉरवर्ड नेते आहेत. त्यांनी राज्यात लवकरात लवकर भाजपाचे सरकार आणावे. अजित पवारही स्पष्टवक्ते आणि शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी पुन्हा आमच्यासोबत यावे, असं राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटलं आहे. नगरमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसुद्धा संयमी आहेत, त्यांनी चुकीच्या सल्लागारांची संगत सोडावी, असंही राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये