ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्ररणधुमाळी

“शिवसेना पक्षाची अवस्था कॉंग्रेस सारखीच”

मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकींनंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४० आमदारांना घेऊन उद्धव ठाकरेंविरोधात बंड केलं. आठ – दहा दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर राज्यात शिवसेनेतील एकनाथ शिंदे गट आणि भाजप याचं सरकार स्थापन झालं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर बंड केलेले अनेक आमदार उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील नेत्यांवर निर्भीडपणे टीका करायला लागले आहेत. महाविकास आघाडीत असताना त्यांच्यावर कसा अन्याय होत असे आणि त्यांना कसे डावलले जात असे याबद्दल बोलत आहेत.

या सर्व राजकारणानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची अवस्था बिकट झाल्याचं दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत उरलेल्या नेत्यांवर आणि मुख्य म्हणजे खासदार संजय राऊत यांच्यावर शिंदे गटातील त्याचबरोबर भाजप मधील नेते टीका करत आहेत. दरम्यान माजी मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी देखील शिवसेनेवर निशाना साधला आहे.

विखेपाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची अवस्था कॉंग्रेस सारखीच झाली अआहे अशी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडील १५ पैकी अनेक आमदार आणि १२ पेक्षा जास्त खासदार सुद्धा बाहेर पडतील, असाही दावा राधाकृष्ण विखेपाटील यांनी केलं आहे. बेताल वक्तव्य करणारे प्रवक्ते आणि भरकटलेलं जहाज अशी अवस्था शिवसेनेची झाली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

राधाकृष्ण विखे पाटील हे अनेकवर्षे कॉंग्रेसमध्ये मंत्री राहिलेले आहेत. त्याकाळात सहकार क्षेत्रात त्याचं मोठं नाव होतं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये